नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर आरोग्य मंत्रालय व नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी केंद्र सरकारच्या लस खरेदीबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
पॉल यांनी याबाबत बोलताना, ‘केंद्र सरकारतर्फे कोव्हीशील्ड लसीच्या २५ कोटी तर कॅव्हॅक्सिनच्या १९ कोटी डोससाठी सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेकला ऑर्डर दिली आहे. याव्यतिरिक्त भारत सरकारने बायोलॉजिकल-ई लसीच्या ३० कोटी डोससाठी ऑर्डर दिली आहे, ही लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होईल.’ अशी माहिती दिली.
‘कोव्हीशील्ड लसीचे २५ कोटी व कॅव्हॅक्सिनचे १९ कोटी असे एकूण ४४ कोटी डोस टप्प्याटप्प्याने डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील. लसींच्या खरेदीसाठी ३० टक्के आगाऊ रक्कम सिरम व भारत बायोटेकला देण्यात आली आहे.’ असेही आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, डॉ. व्हीके पॉल यांच्या सारख्या आरोग्य तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात एक दिलासादायक बातमी दिली आहे. डॉ. व्हिके पॉल यांच्यासारख्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे, की कोरोनाची तिसरी लाट मुलांना अधिक प्रभावित करू शकते, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मागील डेटाही याचे समर्थन करत नाही. तसेच, मुलांच्या पालकांनी लस घेतल्यास, व्हायरस मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही, असेही आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राजकारणात जनता रिटेकची संधी देत नाही, अभिनय क्षेत्राकडे परत जावा’
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- मोदींनी हे ऐकून घेतलं, ते ऐकून घेतलं असं सांगून राज्याचे प्रश्न केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न – निलेश राणे
- महात्मा गांधींच्या पणतीने केला ६२ लाखांचा ‘स्कॅम’; कोर्टाने सुनावला ७ वर्षांचा तुरुंगवास
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

