मुंबई: गुजरात उच्च न्यायालयाचा हीरक महोत्सव कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे तो या कारणामुळे की, या कार्यक्रमात न्यायाधीशांनी मोदींवर आणि मोदींनी न्यायालयावर उधळलेल्या स्तुतिसुमनांमुळे यावर आजच्या सामना अग्रलेखातून सरकारवर तोफ डागत न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या कार्यक्रमात न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी पंतप्रधान मोदी यांच कौतुक केल होत तर पंतप्रधान मोदी यांनी देखिल देशातील न्यायव्यवस्था योग्य न्याय देण्याचे काम करत असल्याच म्हणत जणू त्या कौतुकाची त्यांनी लगेच परतफेड करून टाकली. मात्र न्यायव्यवस्थेच्या अशा सरकारच्या बाजूने असणे नेहमीच पक्षपात होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे यावर आज शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.
‘आपले पंतप्रधान मोदी हे नक्कीच चैतन्यमूर्ती, लोकप्रिय नेते आहेत. आता सर्वोच्च न्यायालयानेच त्यांच्यावर मुद्रा उठवली. मोदींनीही त्या बदल्यात न्यायालयास प्रमाणपत्र देऊन टाकले. न्यायव्यवस्थेचे काम प्रशंसनीय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शहाणपणावरच देशाचे, व्यक्तींचे स्वातंत्र्य टिकून राहते. सत्ताधाऱ्यांच्या बेकायदेशीर उद्रेकापासून सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाचे आहे. त्यांनी ते करत राहावे !’ अशी खोचक टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- “पंतने आपला नैसर्गिक खेळ खेळणे सुरुच ठेवावे, त्यात कोणताही बदल करु नये”
- “कलाकार हे ऐकाकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालत होते; केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली”
- दुसऱ्या कसोटीसाठी १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’

