Share

आजपासून देश अनलॉक, याअनलॉकमध्ये पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात आहेत ‘हे’ नवीन आदेश

Published On: 

पुणे : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत म्हणजे आणखी एका महिन्यासाठी लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र या कालावधीत अनेक गोष्टी शिथिल होणार आहेत. 8 जून पासून म्हणजे आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.अनेक अटी शिथिल होणार असल्याने याला सोशल मीडियावर अनलॉक 1 असं नाव मिळालं आहे.

आत पुण्यातही प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर झाली आहे. २ जून रोजी महापालिका आयुक्त यांनी काढलेल्या आदेशात तीन टप्प्यात शहरात अटींसह शिथिलीकरणास मान्यता दिली होती. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या आदेशानुसार या लॉकडाऊनमध्ये ८ जून म्हणजे आजपासून खाजगी कार्यालये त्यांच्या कर्मचारी संख्येच्या जास्तीत जास्त १० टक्केपर्यंत उपस्थितीत सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे़ याचबरोबर आजपासून वर्तमानपत्रांचे घरपोच वितरण करण्यास (वर्तमानपत्र घेणाऱ्या व्यक्तीच्या सहमतीने) परवानगीही देण्यात आली आहे.

आजपासून सुरु होत आहे या गोष्टी :

खाजगी कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह, तर लग्न समारंभ ५० व्यक्तींमध्ये आणि अंत्यसंस्कार अनुषंगिक कार्यक्रम २० व्यक्तीसह करण्यास मान्यता दिली आहे. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय, माहिती व तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती व पॅकेजिंगकरिता लागणाºया वस्तूंची निर्मिती, दालमिळ, अन्न प्रक्रिया उद्योग, घरकाम करणाºया व्यक्ती जर घर मालकाची इच्छा असेल तर, ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस, वर्तमानपत्रे वितरण व स्टॉल (स्टॉल वितरण मुभा ), वित्तीय क्षेत्र, ई-कॉमर्स (घरपोच वस्तूंचे वितरण), माहिती तंत्रज्ञान (माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यवसाय), खाद्य पदार्थ सेवा (खाद्यपदार्थ पार्सल सेवा), बांधकाम विषयक (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बाहेरील मजूर न आणता कामाच्या ठिकाणी मजूरांच्या राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशा बांधकाम प्रकल्पांना मान्यता), मेट्रोची कामे करण्यास मान्यता दिली आहे. तर धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई.

या गोष्टींना अजून परवानगी नाही :
शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या इ़, सिनेमा हॉल, व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, करमणुकीची ठिकाणे, नाट्यगृहे व या अनुषंगिक ठिकाणे़, सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम आणि कोणतेही कारणाने होणारी मोठी गर्दी़, सर्वसामान्य व्यक्तींसाठी असलेली धार्मिक स्थळे़,केशकर्तनालय / ब्युटी पार्लर, स्पा़, मॉल, हॉटेल, उपहारगृहे आणि अन्य आदरातिथ्य करणाºया सेवा़.

आजपासून देश अनलॉक होतोय, तरीही ‘हे’ बंदच राहणार

अनलॉक १ : राज्यात ३० जूनपर्यंत ‘हे’ सर्व बंदच राहणार

अरविंद केजारीवालांची तब्ब्येत अचानक बिघडली, कोरोनाची टेस्ट होणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!