Share

मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१८ चा निकाल जाहीर : पुण्याच्या श्रुती शिंदेने पटकावलं उपविजेतेपद

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ‘मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१८ चा निकाल नुकताच जाहीर झाला. पॅरिस कम्युनिकेशन प्रा. लि. ने कोलंबो येथे आयोजित केलेल्या मिस अँड मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१८ या स्पर्धेत पुण्याच्या श्रुती शिंदे  उपविजेतेपद (फस्ट रनरअप) पटकावले आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली ‘माझ्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर क्षण आहे.’ आपल्या संपूर्ण प्रवासात समर्थपणे साथ दिल्याबद्दल तिने तिच्या बहिणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

स्पर्धेत झालेल्या अनेक टॅलेंट राऊंडमध्ये श्रुतीने दिलेल्या उत्तरांकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिने स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचाराच्या मुद्यावर आधारित नृत्य सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. श्रुतीने सादर केलेल्या अनेक कलांमुळे कायमच ती चर्चेचा विषय होती.

या स्पर्धेत श्रुतीने ‘मिसेस फोटोजेनिक, मिसेस ब्युटीफुल व मिसेस इंडिया वेस्ट’ ह्या किताबांवर आपले नाव कोरले आहे. स्पर्धेत झालेल्या फेऱ्यांचा सामना करत तिने अखेरीस यश संपादन केले. एका चर्चेत सोशल मीडियापासून होणाऱ्या नुकसानाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, ‘सध्याच्या पिढीमध्ये सोशल मीडिया ‘ट्रेंडिग’ आहे. परंतु यामुळे तरुणाईची दिशाभूल होत आहे. चुकीच्या बातम्या पसरवण्यात सोशल मीडियाची मोठी भूमिका आहे.’

दरम्यान `डॅझल मिस अँड मिसेस इंडिया वर्ल्ड` २०१८ या स्पर्धेसाठी श्रुती शिंदेची ब्रँड अॅम्बेसिडर-महाराष्ट्र म्हणून निवड करण्यात आली आहे. पॅरिस कम्युनिकेशन्स मिस अँड मिसेस इंडिया युनिव्हर्स ने स्त्रियांना एक व्यासपीठ खुले केले आहे ज्यामुळे स्त्रिया आपल्यात असणाऱ्या विविध कलागुणांना येथे वाव देऊ शकतात. या स्पर्धेद्वारे स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृतीही करण्यात येणार आहे.

केदार जाधवच्या पुण्यातील घरी टीम इंडियाला मेजवानी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!