टीम महाराष्ट्र देशा : विरोधी पक्षनेते बोलत असताना संबंधित खात्याचे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहिलेच पाहिजे, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले आहे.
आज विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे आपला विषय मांडत असताना सभागृहात संबंधीत विभागाचे मंत्री उपस्थित नव्हते. हे लक्षात येताच अजित पावरांचा पारा चढला. ते म्हणाले, जेवढं वरचं सभागृह महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त खालचं सभागृह महत्वाचं आहे. मुख्यमंत्री कुणाला करायचं आणि कुणाला नाही याचा अधिकार या सभागृहाचा आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहिलेच पाहिजे असंही त्यांनी सरकारला सुनावलं.
दरम्यान, सभागृहाचं कामकाज सुरू असताना किमान एकतरी कॅबिनेट मंत्र्याने सभागृहात हजर राहावं अशी प्रथा आहे. ज्या खात्याची प्रश्नोत्तरं सुरू आहेत त्या खात्याच्या मंत्र्याने तर हजर राहिलच पाहिजे असा दंडक आहे. मात्र अनेक कामाच्या व्यस्ततेत किंवा नियोजनाअभावी संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित राहू शकत नाहीत


