Share

चंद्रकांत पाटलांवर घोटाळ्याचा आरोप, राष्ट्रवादीकडून राजीनाम्याची मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

बालेवाडी येथे एक भूखंड खेळाच्या मैदानासाठी राखीव होता. शिवप्रिया रिअॅलिटर्स उमेश वाणी यांनी ही जागा आपली असल्याची दाखवत प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला. दरम्यान याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत आपली चूक झाल्याचे मान्य केले.  त्यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या प्रकल्पाला स्थगिती दिली परंतु चंद्रकांत पाटील यांनी ही जमीन शिवप्रिया रिअॅलिटर्सची असल्याचा निकाल देत जमिनीवर ३०० कोटींचा प्रकल्प बिल्डरने उभा केला आहे.

याचदरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने यामुद्यावरून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत. त्यामुळे बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटीलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!