पुणे : आषाढी एकादशीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका उद्या दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर विशेष गाडीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून संध्याकाळी ०७.०० पर्यंत त्या पंढरपुरात पोचतील अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आल्याची माहिती आळंदी देवस्थान समितीचे विश्वस्त अभय टिळक यांनी दिली.
भिडे गुरुजी ! लवकरच ठणठणीत बरा होऊन हा पैलवान आपले आशीर्वाद घेण्यास येईल…
1 जुलै रोजी दोन्ही पालख्यांचे चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, मुख, कळस दर्शन होणार असून त्यानंतर त्या मठात मुक्कामी जातील. 2 तारखेला पालख्यांची पादुका भेट आणि नैवैद्य अर्पण कार्यक्रम होऊन रात्री पालख्या परत येतील. दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी सायंकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आजारी पडल्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरही होम व्कारंटाइन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील यात्रा नियोजनाची जबाबदारी पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. डॉ. भोसले पंढरपुरात दाखल झाले असून त्यांनी सर्व सुत्रे हाती घेतली आहेत.
पाच महिन्यांपूर्वी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे जिल्हाचा कारभार होता. डॉ. भोसले यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी मिलिंद शंभरकर यांची निुयक्ती करण्यात आली. चार महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा याच कामात गुंतून पडली आहे.
‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – अजित पवार
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पंढरपुरात दाखल होत आहेत. या काळातच महापालिका आयुक्त आजारी पडल्याने जिल्हाधिकाºयांना घरात बसून काम करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. या काळात पंढरपूरसाठी एका अनुभवी अधिकाºयाची गरज होती. डॉ. राजेंद्र भोसले यांना पंढरपुरात पाठविण्यात आले आहे.

