Share

भिडे गुरुजी ! लवकरच ठणठणीत बरा होऊन हा पैलवान आपले आशीर्वाद घेण्यास येईल…

Published On: 

पुणे : भिडे गुरूजी, लवकरच ठणठणीत बरा होऊन हा पैलवान आपले आशीर्वाद घेण्यास येईल, असं भोसरी विधानसभेचे आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. फेसबुक पोस्ट करून काळजीचं कारण नाही. लवकरच मी कोरोनावर मात करेन, असा विश्वास महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

भारत सरकारचा ‘तो’ आरोप चुकीचा, टिक टॉकने निवेदन जारी करत केला खुलासा

गेली २-३ महिने कोरोना महामारीत स्वतःला झोकुन देऊन पूर्ण भोसरी मतदार संघाला स्वतःचं कुटुंब समजून जनतेची दिवसरात्र सेवा करण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या महेशदादा लांडगे यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याची माहिती मिळाली. मतदार संघातील मोठं मोठ्या समस्यांना पुरून उरणारे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे कोरोनावरही लवकरचं मात करतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे. अशा भावना आपल्या फेसबुक पोस्टमधून संभाजी भिडे यांनी व्यक्त केल्या होत्या.

दरम्यान, भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार तथा भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अत्यंत हायरिस्क वातावरणात सामाजिक बांधिलकीपोटी त्यांचा मतदार संघातील लोकांशी संपर्क आला होता. तसेच शहरात येणा-या प्रदेश पातळीवरील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

आज ४ वाजता पंतप्रधान देशाशी संवाद साधणार, काय बोलणार याकडे जगाचे लक्ष

मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड कोरोनाचा केंद्रबिंदू बनले आहे. पिंपरी चिंचवड येथे दररोज १५० ते २०० च्या आसपास कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नोंद होत आहे. अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी राज्याचे बडे मंत्री तसेच स्थानीक पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकिला आमदार महेश लांडगे हे देखील उपस्थित होते. त्यांनी मतदार संघातील कोरोनाच्या परिस्थितीवर मान्यवरांसोबत चर्चा केली. तसेच. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतलेल्या बैठकिला ते उपस्थित होते. यावेळी त्यांचा अनेक नेत्यांशी संपर्क आला आहे.

https://www.facebook.com/maheshklandge/posts/3553306228031854

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!