औरंगाबाद : कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे कविता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दोन विशेष काव्य पुरस्कार देण्यात येतात.
या वर्षीचा ‘कुसुमाग्रज काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ समीक्षक प्रा. प्रकाश देशपांडे-केजकर यांना जाहीर झाला आहे. याशिवाय मसापचा ‘कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार’ नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना जाहीर करण्यात आला आहे.
अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. कुसुमाग्रज जयंतीच्या पूर्वसंध्येला किंवा नंतर या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
या वेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोशाध्यक्ष कुंडलिक अतकरे, निवड समितीचे सदस्य प्रा. श्रीधर नांदेडकर आणि कैलाश इंगळे यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा

