Share

मराठा आरक्षणाची सुरुवात आमच्या काळात : अशोक चव्हाण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे. मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात आलेले आरक्षण हे घटनेच्या बाहेर नसून ते वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. अशातच मराठा आरक्षणाची सुरुवात आमच्या काळात झाली असा दावा अशोक चव्हाण केला आहे.

या निकालाविषयी बोलताना चव्हाण यांनी ‘हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. ज्या गोष्टीची सर्वांना इच्छा होती की हे लवकर व्हावे, त्यावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्याची सुरुवात काँग्रेस सरकारच्या राजवटीत झाली होती. त्याला आज अंतिम स्वरूप मिळाले आहे. हा कुठल्या पक्षाचा विजय नाही. ना भाजप ना शिवसेनेचा. हा सकल मराठा समाजाचा विजय आहे’ अस विधान केले.

तसेच ज्यांनी ५८ मोर्चे काढले. मोर्चात लाखो लोक सहभागी झाले. जवळपास ४० जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. मला वाटते त्यांचे योगदान विसरता येणार नाही. हायकोर्टाने मागासवर्ग आयोगाने साथ दिली. त्याचा सर्वांना आनंद आहे आरक्षण कमी केलंय हा कायदेशीर मुदा आहे. जो पर्यंत पूर्ण निकाल वाचत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही. पण १३ टक्के वाईट नाही असंही चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या निर्णयाचं सगळीकडून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि नोकरीत फायदा होणार आहे त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!