टीम महाराष्ट्र देशा : आदित्य ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून ते मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मनोहर जोशी मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात यावं असे म्हटलं आहे.
दरम्यान,शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना फेसबुकच्या माध्यमातून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. राऊत यांना आदित्य यांना गळाभेटीचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. ‘महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे.’ असं फोटोच्या खाली कॅप्शन दिले आहे. या पोस्ट मधून राऊत यांनी आदित्य ठाकरे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेतच दिले आहेत.


