Share

सर्वपक्षीय बैठकीपूर्वी मानापमान नाट्य; निमंत्रण न मिळाल्याने ‘हे’ पक्ष रुसले

Published On: 

नवी दिल्ली : लडाख सीमेवरुन भारत-चीन या दोन देशात तणावाचे वातावरण आहे. चीनकडून भारताला डिवचण्याचे काम सुरु आहे. मात्र आता चीनला चांगलाच धडा शिकविण्यासाठी मोदी सरकराने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सीमा वादानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर चीनच्या काही उत्पादनावर कस्टम ड्यूटी वाढविण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंना आळा बसेल. दरम्यान, यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी आयात वस्तूंवर शुल्क वाढविण्याबाबत चर्चा चालू आहे.

ईश्वर करो अन् राजू शेट्टींना दुसऱ्यांचे पण चांगले चितायची बुद्धी मिळो – सदाभाऊ खोत

दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मात्र ही बैठक सुरु होण्यापूर्वीच मानापमान नाट्य सुरु झाले आहे.

या बैठकीत सोनिया गांधी, एमके स्टालिन, एन. चंद्रबाबू नायडू, जगन रेड्डी, शरद पवार, नीतीश कुमार, डी. राजा, सीताराम येचुरी, नवीन पटनायक, के. चंद्रशेखर राव, ममता बनर्जी, सुखबीर बादल, चिराग पासवान, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, हेमंत सोरेन, मायावती आदी नेते सहभागी होऊ शकतात तसं त्यांना निमंत्रण देखील देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ संपवा, देवेंद्र फडणवीसांची आक्रमक मागणी

तर दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या वतीने असा आरोप केला जात आहे की त्यांच्याकडे चार खासदार असून राज्यसभेचे प्रतिनिधीही आहेत. अशा परिस्थितीत त्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. राष्ट्रीय जनता दलाला निमंत्रित केलेले नाही, अशा परिस्थितीत तेजस्वी यादव यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!