Share

माही विजच्या भावाचे कोरोनामुळे निधन, मदतीसाठी सोनू सूदचे मानले आभार

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने काही दिवसा आधी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन व औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होती. राज्यात सध्या अनलॉक करण्यात आले असले तरी कोरीनाची स्थिती संपली नाही. याकाळात अनेक लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवावे लागले आहे. अशातच आता अभिनेत्री माही विज हिच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. भाऊ रूग्णालयात असताना मदत केल्याबद्दल तिने अभिनेता सोनू सूदचे आभार मानले आहेत.

माहीने एक भावुक पोस्ट शेअर करत भावाच्या निधनाची माहिती दिली आहे. माहीने लिहिले, ‘माझ्या भावाला रूग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी आभारी आहे सोनू सर. मी खचले होते. तुम्ही मला लढण्याचे बळ दिले, आशा दाखवली. माझा भाऊ बरा होऊन घरी परत येईल, अशी आशा मला होती. पण कदाचित तुम्हाला सत्य माहित होते. तुम्ही लोकांच्या मदत करत आहात. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो लोकांना हिंमत आणि सकारात्मकता देण्यासाठीही मी तुमचे आभार आहे.’

https://www.instagram.com/p/CPz7uS-hAiw/?utm_source=ig_embed&ig_rid=0fa0b931-88d6-456c-a7f5-9ebb40ba3188

तर पुढे माहीने भारती सिंहचेही आभार मानले आहेत. भारती, तू रोज माझ्या भावाची काळजीने चौकशी करत होती. व्हिडीओद्वारे मला पॉझिटीव्ह राहण्याची हिंमत द्यायचीस, तुझे आभार, असेही तिने लिहिले आहे.

माहीने तिच्या पोस्टमध्ये सोनू सूदचे एक ट्वीटही टॅग केले आहे. ‘एक २५ वर्षांचा मुलगा, ज्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. तो जगेल याची शक्यता फार कमी होती. पण तरीही मी रोज डॉक्टरांशी बोलायचो. मात्र हे त्याच्या कुटुंबाला सांगण्याची कधीच हिंमत झाली नाही.’ असे सोनूने यात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!