टीम महाराष्ट्र देशा- राज्यात मतमोजणीला सुरूवात झाली असून सुरूवातीच्या कलांनुसार युती मुंबईत पुढे असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. सुरूवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरू करण्यात आली आहे. वांद्रे पूर्वमधून मुंबई महानगरपालिकेचे महापौर आणि शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर हे आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचं आव्हान आहे. त्यांना शिवसेनेनं उमेदवारी नाकारत महाडेश्वरांना उमेदवारी जाहीर केली होती.
एका बाजूला महायुतीची राज्यात घोडदौड सुरु असताना श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर आहेत. त्या १ हजार ७५३ मतांनी आघाडीवर आहेत. तर विनोद घोसाळकर पिछाडीवर आहेत. अदिती तटकरे या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.
दरम्यान,कणकवलीतून नितेश राणे आघाडीवर आहेत. नितेश राणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचं आव्हान आहे. ही निवडणूक राणे कुटुंबीयांसाठी महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी आघाडीवर. ते २ हजार ३१३ मतांनी आघाडीवर आहेत. तर शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील हे पिछाडीवर आहेत.
दरम्यान, महायुतीने जोरदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. राज्यात सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने गाठला बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपने आणि शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली असल्याचे सुरुवातीचे कल हाती येत आहेत.मुंबईतील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल हाती येत आहेत.
शिवसेनेचे वैभव नाईक,दीपक केसरकर,एकनाथ शिंदे आघाडीवर असून सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. सुरेश माने यांच्यात वरळीत प्रमुख लढत होणार आहे. तर ‘मराठी बिग बॉस’फेम अभिजित बिचुकलेही इथून मैदानात उतरलेत.याठिकाणी आदित्य ठाकरे मोठ्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर पहिल्या फेरीत अभिजित बिचुकालेंना शून्य मतं मिळाली आहेत.
https://twitter.com/Maha_Desha/status/1187211230454243328?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187211156147994624?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

