टीम महाराष्ट्र देशा : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे आपल्या बेताल वक्तव्यांनी सतत अडचणीत येत असतात. आज विश्वनाथ महाडेश्वर पुन्हा अडचणीत आले आहेत. महापौरांनी चक्क निषेध करणाऱ्या एका महिलेचा हात पिरगळल्याची घटना समोर आली आहे. तर आपण कोण आहोत हे विसरून महाडेश्वर यांनी जनतेवर अरेरावीची भाषा वापरली आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ सांताक्रुझ पूर्व येथील पटेल नगरमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना स्थानिकांनी घेरलं होतं. या परिसरात अतिवृष्टीमुळे तब्बल 72 तास पाणी तुंबलं होतं. मात्र, एकही लोकप्रतिनिधी येथील परिस्थिती सावरण्यास आला नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष होता. त्यातच, याठिकाणी पाणी तुंबल्यामुळे विजेचा धक्का लागून एकाच घरातील दोघांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप होता. हा संताप स्थानिकांनी महाडेश्वरांवर व्यक्त केला.
यावेळी महाडेश्वर संतप्त झाले त्यांनी आपल्या पदाचं भान विसरत स्थानिकांसोबत अरेरावीची भाषा सुरु केली. महापौरांची स्थानिकांसोबतची अरेरावी एका व्हिडीओद्वारे समोर आली आहे. या व्हिडीओत महापौर एका महिलेचा हात पिरगळताना दिसत आहेत. तर मला ओळखत नाहीस का तू? मी कोण आहे ते माहीत नाही का? नालायकपणा करु नको, दादागिरी चालणार नाही. असे म्हणत महापौर स्थानिकांना धमकावत होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

