Share

बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर माधव देवचकेने केली होती जय्यत तयारी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता माधव देवचकेची ओळख ‘मोस्ट बॅलेन्स्ड बिग बॉस कंटेस्टंट’ अशी आहे. माधवची त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे आणि परफेक्ट ड्रेसिंग सेन्समुळे सध्या सोशल मीडियावरून बरीच वाखाणणी होतेय. बिगबॉसच्या घरात राहायला जाऊन आता माधवला एक महिना झाल्यावर दर ‘विकेन्डच्या वार’च्या वेळी त्याने घातलेल्या एथनिक कपड्यांवरूनही माधवची ह्या अनोख्या खेळासाठीची पुर्वतयारी दिसून येतेय.

माधवची पत्नी बागेश्री ह्याविषयी सांगते, “माझ्या मते, गेल्या एक महिन्यातले सर्व पुरूष कंटेस्टंटचे कपडे पाहता, माधवचं सर्वाधिक पुर्वतयारीनिशी आणि आपल्या घरातल्या वास्तव्याविषयी क़ॉन्फिडंट असलेला एकमेव पुरूष खेळाडू आहे. माधवला एखादी भूमिका रंगवताना, त्या व्यक्तिरेखेची बोलण्या-चालण्याची ढब, संवादफेक, कपडेपट ह्यावर काम करून पूर्वतयारी करण्याची सवय आहे. जशी तो आपल्या एखाद्या मालिकेसाठी किंवा सिनेमातल्या भूमिकेसाठी तयारी करतो, तसाच बिग बॉसच्या घरात जातानाही तो पूर्वतयारीनिशी गेला होता.”

बागेश्री सांगते, “एक अभिनेता असल्याने माधवला स्क्रिनवर कसे कपडे घालावे, ह्याची उत्तम जाण आहे. कलर कॉम्बिनेशन कसे असावे, आपल्याला कसे कपडे शोभून दिसतील हे त्याला चांगले माहित आहे. त्यामुळे त्याने स्वत:साठी कपड्यांची निवडही तशीच केली. त्याने एवढे चांगले कपडे बिगबॉसमध्ये जाण्यासाठी निवडले की, मी त्याला एक फोटोशूटच करून घ्यायला सांगितले. ब-याच कालावधीत माधवने स्वत:साठी फोटोशूट केले नव्हते. त्यामुळे त्यालासुध्दा ही कल्पना आवडली. आणि त्याने प्रोफेशनल फोटोग्राफरकडून स्वत:चे फोटोशूट करून घेतले. मला असं वाटतं, बिगबॉसच्या घरात एवढ्या पूर्वतयारीनिशी गेलेला तो एकमेव सदस्य असावा. ”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!