Share

सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलून भांडणे लावू नका; भांडारी यांचे सरकारला आवाहन

Published On: 

मुंबई –कोरोनाचे गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच रहावेत यासाठी महानगरांमधील हाऊसिंग सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार देण्याचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश धक्कादायक आहे. सरकारने आपली जबाबदारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर ढकलून सोसायट्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करू नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी केले.

माधव भांडारी म्हणाले की, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. शहरांमधील हाऊसिंग सोसायट्यांमध्येही लोक एकमेकांना मदत करतात आणि त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचेही सहकार्य असते. तथापि, अध्यक्ष व सचिवांना विशेष पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार देण्यामुळे सध्याच्या सहकार्याला वेगळे वळण लागून सोसायट्यांमध्ये तणावाचे प्रसंग निर्माण होतील. गेले वर्षभर कोरोनामुळे हैराण झालेल्या समाजात आणखी अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रकार सरकारने करू नये.

ते म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. तथापि, प्रत्यक्षात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सातत्याने आपली जबाबदारी इतरांवर ढकलण्याचा आणि इतरांवर दोषारोप करण्याचा प्रयत्न करत असते. सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांवर जबाबदारी ढकलणे हा त्याचाच एक भाग आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!