Share

एम. पी. मिल कंपाऊंड घोटाळा भोवणार प्रकाश मेहतांना, मंत्रिमंडळातून मिळणार डच्चू

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर उद्या ( रविवार ) चा मुहूर्त लागला आहे. यामध्ये भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर या आयाराम नेत्यांचे मंत्रिपद जवळपास निश्चित मानलं जात असताना मंत्रिमंडळातून नक्की कोणाला डच्चू मिळणार यावर तर्क वितर्क लढवले जात होते.

मात्र, मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश मेहता, प्रवीण पोटे, विद्या ठाकूर, गडचिरोलीचे पालकमंत्री अंब्रीश आत्राम, विष्णू सावरा आणि बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता असून आज सायंकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे आपले राजीनामे सुपूर्द करणार आहेत.

दरम्यान, एम. पी. मिल कंपाऊंड एफएसआय घोटाळ्यात लोकायुक्तांनी दोषी ठरवलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा केली होती.

यानंतर आज सकाळपासून मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार, याविषयी बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!