Share

नितेश राणे आणि निलम राणे यांच्याविरोधातील लूकआऊट सर्क्युलर रद्द

Published On: 

पुणे – ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. नीलम राणे आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने कर्ज घेतलं होते. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, हे सर्क्युलर रद्द करण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत.

नीलम राणे आर्टलाइन प्रॉपर्टीज कंपनीने डीएचएफएलकडून सुमारे ४० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे या कर्जासाठी करण्यात आलेल्या अर्जात सहअर्जदार होते. त्याची ३४ कोटीपर्यंत थकबाकी होती. डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी लुक आउट सर्क्युलर जारी केलं होतं.

पुणे पोलिसांनी सर्क्युलर जारी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कारण हे सर्क्युलर अशावेळी आल होत ज्यावेळी मुख्यमंत्री आणि राणे कुटुंब यांच्यातील संघर्ष पेटला होता. त्यावेळी नितेश राणे यांनी थेट सरकारवर टीका केली होती.दरम्यान, राणे कुटुंब आणि डीएचएफएल यांच्यातील व्यवहार पुर्ण झाल्यामुळे पोलिसांनी सर्क्युलर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती क्राईम पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!