Share

सर्वसामान्यांना आवाचे सव्वा बिले; नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा लोणीकर यांची मागणी

Published On: 

परभणी : गेल्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये वीज वितरण कंपनीने केवळ दोन वेळा वीज ग्राहकांना वीज बिले दिली असून दरम्यानच्या काळामध्ये वीज मीटरची रिडींग घेण्यासाठीही कधी कोणी फिरकले नव्हते. कोरोना संकटाच्या काळात पाच महिन्यांपासून एकदाच बिल आल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकत सर्वसामान्य ग्राहकांना विज वितरन कंपनीने विजेचा शॉक दिला. भूलथापा देणार्या  सरकारने जनतेची माफी मागावी व दिलेल्या शब्दाप्रमाणे वीज बिल माफ करावे आणि वारंवार शब्द फिरून लोकांची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पुढे या पत्रकात म्हटले आहे की, 01 ते 100 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वीज वितरण कंपनी 3 रुपये प्रति युनिट प्रमाणे वीज बील आकारते तर शंभर युनिटचे वर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट सात रुपयाचे दर आकारले जातात . हजार युनिट च्या पुढे वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना बारा रुपये युनिट प्रमाणे बिल आकारले जाते. मात्र कोरोना संकटाच्या काळामध्ये पाच ते सहा महिने कुठल्याही प्रकारची रिडींग न घेता गेल्या महिन्याभरापूर्वी रिडींग घेऊन सर्वसामान्य ग्राहकांनी वापरलेले  शंभरच्या वरचे जे युनिट आहेत ते पाच महिन्यात वापरले होते. मात्र प्रत्येक महिन्याला वीज बिल न दिल्यामुळे या ग्राहकांना तीन रुपया ऐवजी सात रुपये युनिटप्रमाणे वीज बिलाचा भरणा करावा लागत आहे.

300 ते 400 च्या पुढे प्रतिमहिना युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना  हजार च्या पुढे युनिट वापरानंतर  विज बिल दिल्यामुळे त्यांना बारा रुपये युनिट प्रमाणे वीज दर आकारला गेला . त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वीज वितरण कंपनी लुटून खात आहे विजेच्या वाढत्या बिलामुळे काहींनी आत्महत्या केल्या आहेत तर रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेमुळे भोकरदन तालुक्यात काल तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ऊर्जामंत्री मात्र केंद्रावर आरोप करण्यात व्यस्त आहेत. प्रत्यक्षात स्वतः मात्र कोणतीही कृती कारण करताना दिसत नाहीत त्यामुळे हे सरकार जनतेप्रती असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

या वर्षी प्रचंड पडलेल्या पावसामुळे शेती पंपाद्वारे पाणी देण्याचं काम शेतकऱ्यांना  गेल्या सहा महिन्यापासून पडलेली नाही. कारण मराठवाड्यातील संपूर्ण शेतीही पाण्याखाली होती अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वीज बिल आकारू नये भोकरदन तालुक्यातील पिंपळखेड येथील जाधव कुटुंब यावर काल रात्रीच्या वेळेला शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेमुळे काळाने घाला घातला . एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याला महा विकास आघाडीचे सरकार, ऊर्जामंत्री आणि त्यांच्या विभागाचा कारभार कारणीभूत आहे त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थोडी जरी नीतिमत्ता शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा अशी मागणीही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.

वीज वितरण कंपनीने सुद्धा ग्राहकांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता केवळ आणि केवळ सरकारच्या इशार्यावर नाचत सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरुन अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली आहे . आलेली दरमहा आलेली नसून तब्बल सहा सात महिन्यांनंतर विज बिल देण्यात आले आहे त्यामुळे प्रति युनिटचा दर देखील वाढून आला आहे त्यासाठी सर्वसामान्य ग्राहक जबाबदार नसून हेतुपुरस्सर ऊर्जा मंत्र्यांचा आणि ऊर्जा विभागाच्या सांगण्यावरून ही वीज बिले वाढीव स्वरूपात उत्तर देण्यात आली नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकाला पडला आहे. विज वितरन कंपनीने हा सावळा गोंधळ थांबवत विज ग्राहकांना न्याय द्यावा अन्यथा वीज वितरण कंपनी च्या प्रत्येक कार्यालयात समोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आणि आक्रमक स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचे देखील लोणीकर यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

22 नोव्हेंबर रोजी परतूर वीज वितरण कार्यालयासमोर भाजपाचे आक्रमक आंदोलन*वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव बिलांचा दिला जात आहे. त्यामुळे माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनी समोर आणि आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!