Share

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ गाण्याला तब्बल ५५ हजार डिसलाइक्स

Published On: 

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात ते आपल्या गाण्यांमुळे त्याचबरोबर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देखील सध्या अमृता फडणवीस यांचं ‘तिला जगू द्या’ हे गाणं व्हायरल होत आहे त्याचबरोबर या गाण्यानंतर या अनेकांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.

भाऊबीजेनिमित्त पोस्ट केलेल्या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे सांगत आपण पुन्हा नवीन कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असं म्हटलं आहे. अमृता यांनी स्त्रियांना समर्पित केलेल्या या गाण्यामध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. मात्र एकीकडे अमृता यांनी या गाण्याला पसंती मिळत असल्याचं म्हटलेलं आहे.

हे एका बाजूला सुरु असतानाच या गाण्याची निर्मिती करणाऱ्या टी-सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर या गाण्याला लाईकपेक्षा डिस्लाइक जास्त आहेत. अमृता फडणवीस यांचं हे नवीन गाणे लोकांना फारसं आवडलं नाही. यूट्यूबवर रिलीज झालेल्या गाण्याला लाइक्सपेक्षा जास्त लोकांनी डिसलाइक्सच दिले आहेत. नेटकरी लोकांनी तब्बल ५५ हजार डिसलाइक्स दिले आहेत. याशिवाय अनेक नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दरम्यान, १५ लाख लोकांनी हे गाणे पहिले देखील आहे.

दरम्यान,असं असलं तरी मंत्री यशोमती ठाकूर यांनी गाण्याचा आशय चांगला असल्याचं म्हणत त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.“सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल होत आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. माझ्या शुभेच्छा,” असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांचं गाणं शेअर करत कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!