Share

सातारा जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदी

Published On: 

सातारा : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कल्याण, डोंबिवली यानंतर आता सातारा जिल्ह्यत देखील टाळेबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

सातारा जिल्ह्यत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी टाळेबंदी लागू केली. जिल्ह्य़ात १७ ते २२ जुलै दरम्यान ही टाळेबंदी असणार आहे. या काळात शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय, उद्योग, कार्यालये संपूर्णत: बंद राहतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय घराबाहेर कुणीही न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सर्व मार्ग बंद राहतील.

२२ ते २६ जुलै या कालावधीत सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्ह्यत कोरोना बाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात न आल्यास पुन्हा टाळेबंदीचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिला होता. यासाठी सुरुवातीला त्यांनी बाजारपेठ व दुकानांच्या वेळा कमी केल्या होत्या. पण आता टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

सोलापुरात १७ ते २६ जुलैपर्यंत संपूर्ण टाळेबंदी

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, एमआयडीसी सुरू राहणार ; मंगळवारपासून शहर राहणार कडक बंद

कोरोनामुळे सातारा-अमरावतीकरांच्या समस्या वाढल्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!