नवी दिल्ली : कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगावर जगभरात उपचार करण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ जगासमोर आणणार आहे. आचार्य बालकृष्ण यांनी स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत हे आज हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले आहे..
मोठी बातमी : यंदा भारतीयांना हज यात्रेला जाता येणार नाही, पैसे मिळणार परत
पतंजली योगपीठाने दावा केला होता की, त्यांना कोविड – 19 ला रोखण्याचे औषध सापडले आहे आणि ते प्रभावीदेखील ठरले आहे. कोविड – 19 विषाणूविरोधात प्रभावी औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनलॉक सुरू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. जर पतंजली योगपीठाचा दावा खरा ठरला तर देशातील लाखो लोकांना मोठी मदत मिळणार आहे. शिवाय अर्थव्यवस्थाही पुन्हा रुळावर येऊ शकेल.
रामदेव बाबा यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या औषधाच्या वापराने 3 दिवसांच्या आत बरे होतील. पुढच्या 7 दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल. कोरोनिल औषध सकाळी आणि संध्याकाळी एकदा घेतलं जाऊ शकतं. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास मदतगार आहे.
दरम्यान, कोरोनावर आम्ही औषधं शोधून काढली असून ही औषधं 100 टक्के यशस्वी झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आम्ही यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे गिलॉय म्हणजेच गुळवेल, श्वासारी, अश्वगंधा यांचा मुख्य समावेश असलेली औषधं आणणार आहोत. तर, यांच्या समावेशासह कोरोनिल आणि श्वासारी या औषधांची पंतजली आयुर्वेदकडून निर्मिती केली आहे. यासाठी आमच्या क्लिनिकल कंट्रोल ट्रायलमध्ये 100 रुग्ण सहभागी झाले होते. या ट्रायलसाठी क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया (CTRI)कडून आम्ही परवानगी मिळवली होती. या ट्रायलमधले 69 टक्के रुग्ण पहिल्या तीन दिवसांत आणि 100 टक्के रुग्ण सात दिवसांत बरे झाले. अस रामदेव बाबा म्हणाले आहेत.
दमदार अभिनेत्यांपेक्षा विशिष्ट वर्गातीलच लोकांना कामाची संधी अधिक दिली जाते – सैफ अली खान
यावर अनेक लोक आमच्यावर प्रश्न उपस्थित करतील आणि आमच्याबद्दल ईर्ष्या व्यक्त करतील. तसंच, लंगोट आणि धोतर नेसणाऱ्यांनी हे कसं काय शक्य केलं हा प्रश्न सगळ्यांना पडेल. मात्र, हे लंगोट आणि धोतर नेसणाऱ्यांनी प्रत्यक्षात आणलेलं आहे ते तितकच खर आहे. गिलॉय म्हणजेच गुळवले, अश्वगंधा, श्वासारी यांचा मुख्य समावेश आमच्या औषधात आहे. यामुळेच हजारो रुग्ण बरे झाले. कोरोनिल आणि श्वासारी औषधांचं किट लवकरच बाजारात येईल. अस देखील रामदेव बाबा म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

