Share

IND vs BAN | बांगलादेशविरुद्ध कुलदीप यादवने केला ‘हा’ पराक्रम

Published On: 

🕒 1 min read

IND vs BAN | चट्टोग्राम: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) या दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. सध्या या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. तर, या सामन्यातील बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर थांबला. या सामन्यांमध्ये भारतीय संघातील गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने महत्त्वाचे योगदान दिले. या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कुलदीपने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली आहे.

भारतीय संघाने या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत 133.5 षटकांमध्ये 404 धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्र अश्विनी यांनी अर्धशतके केली. त्याचबरोबर ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांनी देखील अनुक्रमे 46 आणि 40 धावांचे योगदान दिले. दरम्यान, भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव 55.5 शतकामध्ये आटोपला. यामध्ये भारतीय संघाने बांगलादेशला सर्वबाद करत 150 धावांवर थांबविले. यामध्ये कुलदीप यादवने भारतासाठी सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.

बांगलादेश येथील चट्टोग्राम मैदानावर पाच विकेट घेणारा कुलदीप यादव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. या सामन्यामध्ये कुलदीपने 16 षटके गोलंदाजी करत चाळीस धावा दिल्या असून पाच विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने मशफिकुर रहिम, शाकिब अल हसन, नुरूल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन यांना पव्हेलियनला पाठवले. भारताकडून चट्टोग्राम मैदानावर पाच विकेट्स घेणारा कुलदीप यादव पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

पहिल्या डावामध्ये भारतीय संघाने 256 धावांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतीय संघाने 25.2 षटकानंतर एक बाद 77 धावा केल्या. यामध्ये कर्णधार के एल राहुल 23 धावा करत बाद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!