टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा उडविणाऱ्या भाजप आणि सेनेत प्रवेश करण्याचा आघाडीतील नेत्यांचा धडाका सुरूच आहे. राज्यात सर्वाधिक काँग्रेसमधून आउटगोइंग सुरु आहे राष्ट्रवादीची परिस्थिती थोडीशी बरी वाटत असताना आता पक्षांतराच्या रोगाची लागण या पक्षातील नेत्यांना देखील होऊ लागली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेेते किरण गुजर हे पक्ष सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्षातील काही लोक विविध मार्गातून आपल्याला कोंडीत पकडण्याचे काम करीत आहेत. मला वैयक्तिकरित्या लक्ष केले जात असल्याचा आरोप किरण गुजर यांनी केला आहे. या सर्व गोष्टीचा आता कंटाळा आला असून वेळ पडल्यास आपण नगरसेवकपदासह राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन वेगळा मार्ग निवडणार असल्याचं गुजर यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

