Share

पुरोगामी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंचावर चक्क शरद पोंक्षेची हजेरी

Published On: 

मुंबई : कोविड काळातील राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या सामाजिक, विधायक कार्यासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्य विश्वस्त मंडळातील सदस्यांनी ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या विविध सामाजिक तसेच विधायक कार्यासंबंधी माहिती दिली. तसेच उपस्थित विविध वैद्यकीय संघटना व कलावंत प्रतिनिधींनी ट्रस्टने केलेल्या मदतीबद्दल आभार मानतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हाच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट उभारण्याचे काम देखील झाले. या ट्रस्टच्या माध्यमातून राज्यात आपत्ती आल्यास त्यावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आतापर्यंत ज्यांनी या ट्रस्टला मदत केली अशा सर्वांचे मनस्वी आभार मानतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोणतीही आपत्ती ही काही काळापुरती मर्यादित असते. परंतु कोविड हा आजार पाहिला तर या आजाराचा मागील तीन महिन्यांपासून प्रादुर्भाव असून जनतेने राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमांचे नियमांचे पालन केले नाही तर फार मोठी किंमत सर्वांना मोजावी लागेल, त्यामुळे प्रत्येकाने शासनाला सहकार्य करत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी जनतेला केले.

रामदेव बाबांच्या कोरोनावरील औषधाला मोदी सरकारचा झटका, घेतला हा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा संकट आले आहे तेव्हा विविध राज्यांमध्ये राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे मदत करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी दिली. गेल्यावर्षी सांगली, कोल्हापूर याठिकाणी भीषण महापूर आला होता. त्यावेळीही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने मदत केलेली आहे. हे कार्य सातत्याने सुरू असून अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहचण्याची आवश्यकता आहे व तळागाळातील गरजू व्यक्तीपर्यंत जाण्याचा ट्रस्टचा उद्देश असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जी मदत केली गेली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो अशा भावना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. मागच्या काळात अजित दादांनी रंगभूमीला ५ कोटी रुपयांची मदत केली होती. अशीच मदत या संकटकाळातही करावी, अशी विनंतीही शरद पोंक्षे यांनी अजित पवार यांना यावेळी केली. मात्र गांधी विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंचावर गांधी हत्याचे समर्थन करणारा शरद पोंक्षे यांची हजेरी चर्चेचा विषय बनली आहे.

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी: अशोक चव्हाण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!