Share

जयसिद्धेश्वर स्वामी यांची खासदारकी गेली ? अनं अजित पवार कामाला लागले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा दारून पराभव करत,आपला विजयश्री खेचून आणणारे सोलापूरचे विद्यमान भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांची खासदारकी जातीच्या दाखल्यामुळे अडचणीत आली आहे.

विभागीय जात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे. जयसिद्धेश्वर यांची खासदारकी रद्द होते का? हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेलच. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आतापासूनच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसते आहे.

जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जागेवर पोटनिवडणूक लढवली जाणार आहे. ही जागा पूर्वी काँग्रेसने लढवली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावं लागेल. त्यांचे एकमत झाले तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल, असे अजित पवार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिदेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी आता धोक्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या संदर्भात जातपडताळणी समितीने अंतिम सुनावणी घेतली होती. त्याचा अंतिम अहवाल आज तक्रारदारांना देण्यात आला.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दाखल केलेला बेडा जंगम जातीचा जात वैधता दाखला बनावट असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे यांनी केली होती.गायकवाड आणि मुळे यांच्या तक्रारीनुसार जातपडताळणी समितीने दक्षता पथक नियुक्त करण्यात आले होते, त्यात सर्व कागपत्रांची शहानिशा करून खासदारांनी दाखल केलेला बेडा जंगम प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!