मुंबई: एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. काल दिल्ली पोलिसांकडून दहशतवादी कटाच्या कारस्थान प्रकरणी ६ जणांना अटक केली आहे. यापैकी जान मोहम्मद हा मुंबईमधील धारावीचा असल्याचे समोर आले आहे. जान मोहम्मदबद्दल एटीएसने एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
जान मोहम्मदचे साधारण २० वर्षांपासून दाऊदशी जुने संबंध होते. सध्या त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तो धारावीच्या झोपडपट्टीत रहायचा.१३ तारखेला तो दिल्लीला जाणार होता. तिकीट उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेमधून तात्काळने जाण्याचं नियोजन केलं. आरोपी गोल्डन टेम्पल ट्रेनने दिल्लीला रवाना झाला होता. जान मोहम्मद अली महम्मद शेखला रेल्वे राजस्थानमधील कोट्यामध्ये अटक करण्यात आली आहे.
Delhi Police Special Cell has arrested 6 terrorists. Out of the 6 persons arrested yesterday, one person belongs from Dharavi, Mumbai. He had D-company links. He was arrested in Kota while he was travelling on a train to Delhi: Maharashtra ATS Chief Vineet Agarwal pic.twitter.com/p5KdtCQNkV
— ANI (@ANI) September 15, 2021
दरम्यान या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसचं एक पथक आज सायंकाळी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिली आहे. आमचे पोलिस त्यांना हवी असलेली माहिती देतील.असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दहशतवाद्याच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
- ‘दिल्लीत यंदा फटाक्यांवर असणार बंदी’, केजरीवाल सरकराचा निर्णय’
- ‘या’ कारणामुळे पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण घेतले, अटकेतील संशयितांचा खुलासा
- आर्थिक मदतीसाठी तालिबानने अमेरिका वगळता सर्वांचे मानले आभार
- ओबीसी आरक्षणाच्या निषेधार्थ औरंगाबादेत चक्काजाम! कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात


