Share

‘तो मी नव्हेच’, इंदुरीकरांचे तृप्ती देसाईंच्या नोटिशीला उत्तर

Published On: 

अहमदनगर : महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली यावर उत्तर देताना इंदोरीकर महाराज यांनी आपण असं बोललोच नसल्याचा दावा केला आहे. देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांच्या समर्थकांकडून अपमानास्पद वागणूक आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी इंदोरीकर महाराज यांना थेट कायदेशी नोटीस बजावली. यानंतर इंदोरीकर महाराज आणि तृप्ती देसाई यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत.

राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार-अजित पवार

माझे कोणी समर्थक नाही. अज्ञात लोकांनी तृप्ती देसाई यांना धमकी दिली असेल तर त्यास मी जबाबदार नाही. कीर्तनातून महिला अपमानित होतील, अंधश्रद्धा पसरेल असे वक्तव्य आजपर्यंत कधीच केलेले नाही, असे निवृत्ती महाराज देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनातून अंधश्रद्धा पसरविणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते. महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करीत जाहीररित्या अपमान केला, असा आरोप करीत या मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ऍड. मिलिंद पवार यांच्यामार्फत 26 फेब्रुवारी रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती. महिलांची जाहीर माफी मागावी व पुन्हा अशी टिप्पणी करणार नाही, असे जाहीर करावे, अशी मागणी देसाई यांनी नोटीशीद्वारे केली होती. या नोटिशीला इंदोरीकर महाराज यांनी त्यांचे वकील ऍड. डॉ. मिलिंद साळुंखे यांच्यामार्फत ऍड. पवार यांना उत्तर दिले आहे. देसाई यांनी केलेले आरोप या नोटीसद्वारे इंदोरीकर महाराज यांनी फेटाळून लावले आहेत.

देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात आवाज उठवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमक्या दिल्या आल्या होत्या. याविरोधात त्यांनी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात निवृत्ती महाराज देशमुख व धमकी देणाऱ्या विरोधात तक्रार दिली आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे ती तक्रार प्रलंबित आहे.

इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात दाखल असलेल्या फौजदारी खटल्याची संगमनेर न्यायालयाने दखल घेतली आहे. पुढील न्यायालयीन प्रकियेबाबत समन्स काढण्यात येईल. त्यात इंदोरीकर महाराजांनी न्यायालयात कधी हजर व्हायचे याचा उल्लेख असेल. अद्याप याबाबत समन्स मिळाले नाही, असे इंदुरीकर महाराजांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

‘फडणवीस रोज कुठे ना कुठे फिरताहेत मात्र मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत’

निवृत्ती महाराज देशमुख यांच्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर व त्यांच्या कीर्तनातील वक्तव्यावरून गोंधळ झाल्याने निवृत्ती महाराज देशमुख यांनी दिलगीरही व्यक्त केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!