Share

तुमचे जुने वाहन प्रदूषण करणारे आहे ? भरावा लागू शकतो ‘हा’ कर !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशातील वाढते प्रदूषण लक्षात घेता यावर उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये वाहनांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणात प्रदूषण होते. यावर केंद्र सरकारने आता प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कर लावण्यासाठी एक प्रस्ताव आणला आहे.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात भारताचा प्रदुषणाच्या बाबतीत जगात आघाडीवर आहे. यामध्ये मांडण्यात आलेल्या निष्कर्षामध्ये 2017 साली झालेल्या 15 टक्के मृत्यू प्रदूषणामुळे झाले, असे ‘ग्लोबल अलायन्स ऑन हेल्थ अँड पोल्युशन’ (जीएएचपी) संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. भारत आणि चीन हे देश अशा प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये आघाडीवर आहेत, असा धक्कादायक निष्कर्ष या संस्थेच्या अभ्यासातून समोर आला आहे. जगात अचानक 83 लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 23 लाख मृत्यूंची भारतात नोंद झाली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर हरित कर (ग्रीन टॅक्स) लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामागे पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि प्रदूषण कमी करणे हा हेतू आहे. आठ वर्षांहून अधिक जुन्या वाहतुकीच्या वाहनांवर हरित कर लागू होणार आहे. तर वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाच्यावेळी हा कर लागू होणार आहे.वैयक्तिक वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांवर हरित कर लागू होणार आहे.सावर्जनिक सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर कमी हरित कर लागू होणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.

यामध्ये जुन्या वाहनांवरील हरित करांमधून हायब्रीड, इलेक्ट्रिकसह सीएनजी, इथेनॉल आणि एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांना वगळण्यात आल आहे. हरित करामधून मिळणाऱ्या महसुलाचा वापर हा प्रदुणावरील उपाययोजना करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे. हरित कर लावण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. यावर अधिसूचना काढण्यापूर्वी हा प्रस्ताव राज्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!