🕒 1 min read
मुंबई : व्हॉट्सअॅपचे एक बनावट अॅप दहा लाख युझर्सने डाऊनलोड केल्याचे समोर आले आहे. या अॅप डेव्हलपरने हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसणारे अॅप तयार केल्यामुळे ज्या वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप बद्दल विशेष माहिती नाही अशा दहा लाख युझर्सने हेच अॅप डाऊनलोड केले आहे. या बनावट अॅपच्या माध्यमातून फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे या गंभीर समस्येकडे गुगलनेही पाहण्याची गरज आहे. हॅकर्सने युनिकोडचा वापर करुन हुबेहूब नावं दिल्याचे सांगण्यात येत आहे. रेडिट युझरने एक स्क्रीन शॉट शेअर केला असून यामध्ये WhatsApp+Inc%C3%A0 लिहिलेले आहे. मात्र ते गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp Inc डेव्हलपरच्या नावाने दिसत आहे. त्यामुळे युझर्सची फसवणूक होत आहे.


