Share

चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत काय? : विजय वडेट्टीवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात १५ सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली होती. यावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात १५ सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागण्याची शक्यता असून १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाजही चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला होता. यावर वडेट्टीवार यांनी पाटील यांच्यावर टीका करत, चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत की मुख्यमंत्र्यांनी त्यांना निवडणूक आयोगात डेप्युटेशनवर पाठवलं आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे नेते आकडे जाहीर करतात आणि चंद्रकांत पाटील तारखा जाहीर करत आहेत त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, वडेट्टीवार यांनी ‘यापूर्वी अबकी बार ३०० के पार’ अशी घोषणा दिली होती. तेव्हा ३३० जागा जिंकल्या. आता राज्यातील नेते अबकी बार २२० के पार अशी घोषणा दिली जातेय. ही माहिती यांना मिळते कशी, निवडणूक आयोग यांना तारखा सांगते का असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!