Share

शिवसेना खासदार संजय राऊत घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

Published On: 

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. शिवसेनेत नेहमी टोकाची भूमिका घेणारे तसेच सत्तेत असूनही भाजपवर शाब्दिक प्रहार करणारे राऊत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाबाहेर जाऊन मुलाखत घेणार आहेत. ही मुलाखत लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून खासदार संजय राऊत आक्रमकतेने भाजपाविरोधात तोफ डागत असतात. तसेच अनेक वेळा त्यांनी भाजपला अडचणीत आणले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांकडून शिवसेनेसोबत जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलाखतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.

देवेंद्र फडणवीस कधी भाजपला सिंह म्हणून बोलतात तर शिवसेना वाघ त्यामुळे मुलाखतीच्या व्यासपीठावर वाघ आणि सिंहाची लढाई पाहायला मिळणार का ? अशी चर्चा वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी १० एप्रिलला मुंबईच्या वरळी येथील एनएससीआय येथे हे दोन नेते आमनेसामने येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!