🕒 1 min read
मुंबई : विधानसभा 2019 नंतर राज्यात वेगळ्यापद्धतीचं राजकारण अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या रुपात राज्यातील जनता सत्ताकारण अनुभवत आहे. मात्र अधूनमधून या सत्ताकारणात काहींना काही वादळं निर्माण होताना पाहायला मिळतात. शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे.
संजय राऊत यांनीच याबाबत ट्वीटरवरुन याची माहिती दिलीय. येत्या शनिवार पासून 3 भागांत ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. संजय राऊत यांनी ट्विटर वरून या मुलाखतीचा टिझर समोर आणला असून या मुलाखतीला ‘एक शरद…सगळे गारद’! अस नावं दिल आहे. त्यामुळे या मुलाखातीकडे संपूर्ण देशातील राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1280697533027794944?s=20
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा बोचरा सवाल देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना विचारला आहे.
शरद पवारांच्या त्या मुलाखतीला संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते, असे म्हणत ‘सामना’ हे आता शिवसेनेचे नाही, तर तीन पक्षांचे मुखपत्र असल्याची खोचक टीका फडणवीसांनी केली. बदल्यांचे आणि फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी कोरोनावर लक्ष द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
धक्कादायक : दहावीची परीक्षा दिलेले 32 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
कोणाचा मंत्री कुठे फिरतोय, हे मुख्यमंत्र्यांचं कळेना ; सुजय विखेंचा टोला
कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
