Share

Instagram Reel कसे करायचे डाऊनलोड? जाणून घ्या!

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: Instagram ( इंस्टाग्राम) हे आजचे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते. त्यामुळे इंस्टाग्राम ची लोकप्रियता अधिकच वाढत चालली आहे. इंस्टाग्राम वरील सर्वात लोकप्रिय फीचर म्हणजे Instagram Reel (इंस्टाग्राम रिल). आजकाल वापरतकर्ते मोठ्या प्रमाणावर इंस्टाग्राम बनवतात आणि तितक्याच आवडीने बघतात. बराच वेळा आपल्याला एखादी रिल एवढी आवडते की ती आपल्याला आपल्या फोन मध्ये डाऊनोड करावीशी वाटते. पण अनेकदा रिल कशी डाऊनलोड करायची हे आपल्याला माहीत नसतं. या बातमीमध्ये इंस्टाग्राम रिल कशी डाउनलोड करायची हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कम्प्युटर आणि लॅपटॉप वर इंस्टाग्राम रिल कसे डाउनलोड करायचे ?

कम्प्युटर आणि इंस्टाग्राम रिल डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इंस्टाग्राम रिलची URL कॉपी करावी लागेल. त्यानंतर https://ssyoutube.com/ या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईट उघडल्यावर समोरच तुम्हाला एक रिकामा बॉक्स दिसेल. त्या रिकाम्या बॉक्समध्ये ती कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. त्यानंतर बॉक्स शेजारी असलेल्या डाऊनलोड बटनावर क्लिक करा. डाऊनलोड बटणावर क्लिक केल्यानंतर तुमची रिल कम्प्युटर आणि लॅपटॉप मध्ये डाऊनलोड होऊन जाईल.

Android फोनमध्ये Instagram Reel कसे डाऊनलोड करायची ?

Android फोनमध्ये इंस्टाग्राम रिल डाऊनलोड करणे सर्वात सोपे आहे. इंस्टाग्राम डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोन मधील प्ले स्टोअर वर जावे लागेल. प्ले स्टोअर ला गेल्यानंतर इंस्टाग्रामसाठी डाऊनलोडर इन्स्टॉल करावे लागेल. डाउनलोड इन्स्टॉल झाल्यावर डाऊनलोड करायच्या इंस्टाग्राम रिलची URL कॉपी करून डाऊनलोड ॲप मध्ये ती पेस्ट करा. त्यानंतर ती रिल तुमच्या फोन मध्ये डाऊनलोड झालेली असेल.

iPhone मध्ये Instagram Reel कसे डाऊनलोड करायचे ?

iPhone मध्ये रिल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला ॲपल ॲप स्टोअर मध्ये जावे लागेल. नंतर तिथून तुम्हाला इन्स्टासेव्हर ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर जे इंस्टाग्राम रिल तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे, त्याची URL कॉपी करावी लागेल. URL कॉपी झाल्यावर इन्स्टासेव्हर ॲप उघडून त्यावर Allow Paste वर क्लिक करा. तिथे URL पेस्ट झाल्यावर खाली दिलेल्या Save पर्यायावर क्लिक करा. Save झाल्यावर तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये ते इंस्टाग्राम रिल दिसेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!