Share

भारत मुद्दामून सामना हरणार, माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंडच्या मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रफॉर्ड मैदानावर आज भारत वि. वेस्ट इंडीज सामना होत आहे. त्यामुळे विजयी मालिका कायम राखण्यासोबतच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज सामना खेळणार असल्याचंं सांगितलंं जात आहे. मात्र पाकिस्तानला उपांत्य फेरीत येऊ न देण्यासाठी भारत काही सामने हरणार असल्याचा दावा पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनी केला आहे.

विश्वचषकात भारत आता पर्यंत एकही सामना हरलेला नाही. त्यामुळे आपली ही विजयी घोडदौड चालू ठेवण्यासाठी भारत आज वेस्ट इंडिजला हरवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बसीत अली याने अजीबोगारोब दावा केला आहे. भारतीय संघ पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठू देणार नाही. पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळू नये, यासाठी भारत जाणूनबुजून खराब प्रदर्शन करून बांग्लादेश आणि श्रीलंकेविरोधात पराभव पत्करणार असल्याच त्याने म्हंटले आहे.

कारण सुरुवातीचे काही सामने हरल्यानंतर पाकिस्तानने धक्कादायक पद्धतीने उपांत्य फेरीच्या शर्यतीत आगमन केले आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्युझीलंडसारख्या मातब्बर संघांना धूळ चारत पाकिस्तानने गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. यामुळेच पाकिस्तान देखील उपांत्य फेरीच्या शर्यतीत सहभागी झाले आहे.

दरम्यान, भारतीय चाहत्यांचे लक्ष भारत वि. वेस्ट इंडीज सामन्याकडे लागले आहे. भारताने प्रथम नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ आठवेळा समोरासमोर आले आहेत. त्यात भारतीय संघाने पाच, तर विंडीजने तीन विजय मिळवले आहेत. १९९६च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने विंडिजविरुद्धी विजयी परंपरा कायम राखली आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर उभय संघ दुसऱ्यांदा भिडतील.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!