टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. भारताने पाकिस्तानहून येणाऱ्या २०० शिखांची रेल्वे रोखत अपमान केला आहे. सगळी दस्तावेज व्यवस्थित पाठवून देखील भारताने त्यांच्या हद्दीत रेल्वेला येणास मज्जाव घातला आहे, असे आरोप पाकिस्तानने केले आहेत. तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण देत पाकिस्तानचा हा आरोप फेटाळला आहे.
गुरू अर्जून देव यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतात शिखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमधील शीख बांधव येणार होते. यासाठी भारताने त्यांना व्हिसा देण्यात आला होता. हे सर्व जण पाकिस्तानच्या एका रेल्वेने शुक्रवारी भारतात पोहोचणार होते. परंतु, भारत सरकारने शीख प्रवाशांच्या पाकिस्तानी रेल्वेला आपल्या सीमेत प्रवेश नाकारला आहे.
कारण पाकिस्तानकडून रेल्वेच्या प्रवेशासाठीचा प्रस्ताव व्यवस्थित पाठवण्यात आला नाही, त्यामुळे पाकिस्तानहून आलेल्या शीख प्रवाशांच्या रेल्वेला प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्र्यालयाने दिली आहे. तर या प्रवाशांना भारतात प्रवेश का नाकारला?, याची माहितीही भारताने दिली नाही, असा आरोप इवैक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) चे प्रवक्ते आमीर हाश्मी यांनी केला आहे.


