Share

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ‘या’ बड्या दिग्दर्शकाने मुंबई पोलिसांकडे केला मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यामुळे बॉलिवूड मध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली असून चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. अत्यंत प्रभावी व हुशार व्यक्तिमत्व असलेल्या सुशांत ने अचानक मुंबईतील बांद्रामध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामागील कारण मात्र अस्पष्ट असून पोलीस सर्वच शंका तपासून पाहत आहेत.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. शेखर कपूर यांनी ई-मेलच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना त्यांचा जबाब पाठवला आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांना शेखर कपूर यांचाही जबाब नोंदवायचा होता. मात्र, शेखर कपूर मुंबईत उपलब्ध नसल्याने त्यांनी आपला जबाब ई-मेल द्वारे मुंबई पोलिसांना पाठवला आहे.

दरम्यान, शेखर कपूर यांचा जबाब खूपच धक्कादायक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुशांत सिंग राजपूतने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे म्हटलं जात आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस हा सगळा तपास करत आहे. सुशांत सिंग राजपूत हा डिप्रेशनमध्ये कसा गेला याचा सर्व उलगडा शेखर कपूर यांच्या जबाबातून झाला आहे.

शेखर कपूर यांनी ई- मेल द्वारे केलेल्या जबाबात म्हणतात-
‘यशराज फिल्म्सतर्फे ‘पाणी’ हा चित्रपट बनवण्यात येणार होता. या चित्रपटात सुशांतची महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाच्या निर्मितीबाबत मी अनेकदा यशराज फिल्म्सला भेट द्यायचोय याच दरम्यान एकदा सुशांतची आणि माझी ओळख झाली. त्यानंतर आम्ही सतत संपर्कात होतो. या चित्रपटाचा बजेट दीडशे कोटी रुपये होता. २०१३ मध्ये या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात होणार होती. पुढील दोन ते तीन वर्षात यशराज फिल्म्सने या चित्रपटाची मोठी तयारी केली होती. प्री प्रोडक्शनवर सुमारे ७ कोटी रुपये खर्च केले होते. मोठ्या प्रमाणात या चित्रपटाचं काम सुरु झालं होतं. त्यामुळे मी आणि सुशांत नेहमी संपर्कात होतो.’

‘ या चित्रपटात सुशांत गोरा गोरा या भूमिकेत होता. या भूमिकेसाठी तो खूप प्रयत्न करत होता व त्याशिवाय त्याला दुसरं काहीच सुचत न्हवत. सुशांत आपल्या भूमिका साकारताना अभिनयासाठी किती वेडा आहे हे तो प्रत्येक क्षणी सिद्ध करत होता. मात्र, पुढे या चित्रपटाच्या निर्मिती बद्दल काही काल्पनिक मुद्द्यांवर माझं अमी आदित्य चोप्रा यांचे मतभेद झाले. त्यानंतर चित्रपट बनणार नाही, हे समजल्यावर सुशांत खूप खचला होता. एका संध्याकाळी तो माझ्या घरी आला व गळ्यात पडून खूप रडला. त्याला पाहून मला देखील रडू कोसळलं. मी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला.’

‘या चित्रपटाचं बजेट मोठं होत. सुशांत सिंहला घेऊन एवढा मोठा चित्रपट बनवायचा नव्हता. सुशांतवरती इतका पैसा लावायला कोणी तयार नव्हतं. यशराजसोबत करार आणि कोंट्रेक्ट तोडल्यापासून इंडस्ट्रीमध्ये त्याला वेगळी वागणुक दिली जात होती. चित्रपट मिळू नये यासाठी सुनियोजित पद्धतीने काही लोकांकडून प्रयत्न केले जात होते. तेव्हा देखील कि समजवल कि, तू फक्त काम करत राहा, तू पुन्हा एकदा यशस्वी होशील, चांगलं नाव कामावशील.’

‘त्यानंतर सहा ते सात महिने मी त्याच्या संपर्कात नव्हतो. तो डिप्रेशनमध्ये गेलाय याची मला कल्पना नव्हती. त्याने आत्महत्या केल्याचं मला कळालं, त्यावेळी मला धक्काच बसला.’ शेखर कपूर यांच्या धक्कादायक जबाबनंतर आता नक्कीच पोलीस यंत्रणेला मूळ कारण शोधण्यात मदत होऊन, दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

संजय राऊत, सुशांत सुशांत सिंह राजपूतला ‘हा’ रोल करणार होते ऑफर

ऋषी कपूर यांना देशभरातील दिग्गज मंडळींनी ‘अशी’ अर्पण केली श्रद्धांजली

आई करीनाला वाटते की तैमुरने करावे ‘या’ क्षेत्रात करिअर

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!