Share

ऋषी कपूर यांना देशभरातील दिग्गज मंडळींनी ‘अशी’ अर्पण केली श्रद्धांजली

Published On: 

विवेक पोटफोडे : जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. ते कँसर या आजाराने ग्रस्त होते. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री उशीरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कँसरशी त्यांची झुंज सुरू होती. मात्र ही झुंज अपयशी ठरली आहे. जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल आदी मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी पुढील शब्दात श्रद्धांजली वाहीली.

भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दुवा होते, हा दुवा निखळला आहे. निखळ करमणूक आणि चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले. ते सहज सूंदर अभिनेते होते आणि तितकेच परखड,प्रांजळ व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राची हानी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली

“ऋषी कपूर हे अष्टपैलू, प्रेमळ आणि चैतन्यशील होते. मला अजूनही आमचं सोशल मीडियावरील बोलणं अजूनही आठवतं. ते भारतीय सिनेसृष्टीच्या प्रगतीसाठी नेहमीच उत्साही असायचे. त्यांचे निधनामुळे मला फार दु:ख झाले. मी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

राज्यपालांकडून शोक व्यक्त

“भारतीय चित्रपट सृष्टीतील ‘पहिले घराणे’ म्हणून लौकिक असणाऱ्या कपूर घराण्यात जन्मलेल्या ऋषी कपूर यांने सिनेसृष्टीला प्रदीर्घ काळ मोठे योगदान दिले. चित्रपट सृष्टीच्या सुर्वण कालखंडात अनेक दिग्गज अभिनेते व महानायकांच्या मांदियाळीत ऋषी कपूर यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिलीदेखण्या आणि सहज सुंदर अभिनयाने साकारलेले ऋषी कपूर यांचे अनेक चित्रपट लोकांच्या दीर्घकाल स्मरणात राहतील. इरफान खान यांच्या मागोमाग ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे,” असेही राज्यपाल म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं ट्विट

“ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख,हरहुन्नरी,सदाबहार अभिनेता आपण गमावला.आनंदी,उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं.त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला.भारतीय चित्रपट विश्वात त्यांचं नाव,त्यांचा अभिनय अजरामर राहील!त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!,” असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राहुल गांधीकडून श्रद्धांजली 

“अभिनेते इरफान खान यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी कपूर यांचे निधन होणे हे भारतीय सिनेमासाठी फार मोठे नुकसान आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. भारतीय सिनेसृष्टीसाठी हा आठवडा फार भयानक आहे. या आठवड्यात ऋषी कपूर, इरफान खान अशा दोन दिग्गज नेत्यांचे निधन झआले. ते अतिशय उत्कृष्ट अभिनेते होते. अनेक पिढ्यांपिढ्या त्यांची नेहमीच प्रशंसा करत. त्यांची खूप आठवण येईल,” असे म्हणत राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.

अभिनेता अक्षय कुमारची प्रतिक्रिया

“मला असं वाटतं की आपण एका वाईट स्वप्नातून जात आहोत, आताच ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले. ते एक ज्येष्ठ अभिनेते, एक महान सह कलाकार आणि एक चांगली फॅमिली फ्रेंड होते,” अशी प्रतिक्रिया अभिनेता अक्षय कुमार यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!