नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ सौदी अरेबियात राहणाऱ्यांनाच हज यात्रा करता येणार आहे. यापूर्वी हज रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात होते. त्यामध्ये आता हा बदल करण्यात आला आहे. परदेशातून येऊ इच्छित असलेल्या लोकांना यावर्षी हज यात्रा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यावेळी हज यात्रा करणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, गतवर्षी 25 लाख लोक यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, भारतातून हज यात्रेसाठी पैसे जमा केलेल्या 2.3 लाख लोकांना त्यांचे पैसे बँक खात्यात परत मिळणार आहेत असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
‘जागतिक नेत्यांच्या’ वैयक्तिक मैत्रीचा देशाला फायदा नाही, रोहित पवारांचा मोदींवर घणाघात
महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भारतीयांना हज यात्रेवर पाठवले जाणार नाही असे निर्णय झाला आहे. सौदी अरेबियाच्या हज मंत्र्यांनी सोमवारी रात्रीच हज यात्रा परदेशींसाठी रद्द झाल्याची माहिती दिली होती. सोबतच, यावर्षी भारतीयांना पाठवू नये असा सल्ला दिला होता.
अस केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, हज यात्रा करण्यासाठी ज्या भारतीयांना पैसे जमा केले आहेत, ते आपले पैसे परत घेऊ शकतात असे काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.
मुंबईत कोरोनाचा हाहाकार; शिवसेनाभवन पुढील काही दिवस बंद राहणार
हज यात्रा रद्द झाल्यानंतर पेमेंटचे काय होईल याची माहिती महाराष्ट्रातील फेडरेशन ऑफ हज पिलग्रिम्स सोशल वर्कर्सचे महासचिव शेख फैसल यांनी दिली. त्यानुसार, हज यात्रा करण्यासाठी ज्या भारतीयांना पैसे जमा केले आहेत, ते आपले पैसे परत घेऊ शकतात असे काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. यासाठी लोक हज कमिटीच्या वेबसाइटवर जाउन कॅन्सलेशन फॉर्म भरत होते. यात त्यांच्या बँक खात्याची खात्री पटल्यानंतर रिफंडची प्रक्रिया सुरू केली जात होती. परंतु, आता हज यात्रा रद्दच झाल्याने भारतातून हज यात्रेसाठी ज्या-ज्या लोकांनी बुकिंग केली होती, त्या सर्वांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. बुकिंग करताना जे बँक डीटेल देण्यात आले होते, त्यामध्ये हे आपो-आप जमा होणार आहेत अशी माहिती शेख यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

