Share

युतीच्या चर्चेत आम्ही कोणत्या थरावर आहोत हे उद्या दिल्लीत कळेल – आदित्य ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर भाजप – सेना युतीमध्ये कमालीचा तणाव आहे. भाजप आणि शिवसेना नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसतानाच आदित्य ठाकरेंच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.’दहीहंडीत अनेक थर असतात. त्यामुळे युतीच्या चर्चेत आम्ही नेमक्या कोणत्या थरावर हे उद्या दिल्लीत ठरेल’, असं सुचक वक्तव्य शिवसेनेच्या युवासेनेचं अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठात म्हाडाच्या मुक्तछंद महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं आहे. या कार्यक्रमाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, विनोद घोसाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, दहीहंडीच्या खेळात एक टीम असते. एकमेकांवर विश्वास असतो. आम्ही कोणत्या थरावर राहणार आहोत. हे तुमच्यावर (मधू चव्हाण) उद्या दिल्लीत ठरणार आहे. आमचे काही वाद किंवा मतभेद झाले असतील. त्याबद्दल मी काही स्पष्टीकरण देणार नाही.दिल्लीत उद्या शुक्रवारी भाजप कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे

दुष्काळ गंभीर , शिवसेना खंबीर… बीड येथील उद्धव ठाकरेंच आक्रमक

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!