Share

परभणी ; लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमदाराने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं – भाजप जिल्हाध्यक्ष

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी शिवसेना आमदार राहुल पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार राहुल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा प्रचार केला आहे, असा गंभीर आरोप आनंद भरोसे यांनी केला.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत परभणीत शिवसेनेचे संजय जाधव आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यात लढत झाली, निवडणुकीत संजय जाधव यांनी विजय मिळवला. परंतु मतमोजणीत संजय जाधव हे ३२ हजार मतांनी पिछाडीवर गेले होते.यावरून आनंद भरोसे यांनी आमदार राहुल पाटील यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेचे विद्यमान आमदार राहुल पाटील यांनीच शिवसेना उमेदवार संजय जाधव यांच्या विरोधात काम केल्याने या मतदारसंघात शिवसेनेची पीछेहाट झाली असून आता ते कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जाणार, अशी टीका आनंद भरोसे यांनी केली. इतकेच नव्हे तर, आम्ही आणलेल्या निधीचे श्रेय घेऊन उद्घाटन करण्याचा सपाटा त्यांनी लगावला आहे. ते चोर व गद्दार आहेत असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

विशेष म्हणजे, परभणीत गेल्या ३० वर्षांपासुन शिवसेनेचे वर्चस्व आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप- सेना स्वबळावर निवडणूक लढली होती. त्यावेळी, शिवसेनेकडून राहुल पाटील तर आनंद भरोसे यांचा काँग्रेस मधून भाजप प्रवेश करत उमेदवारी लढवली होती. त्यावेळी राहुल पाटील यांनी भरोसे यांचा दारुण पराभव केला होता. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा प्रचार केल्याचा आरोप करत आगामी विधानसभा निवडणुकीत परभणीची जागा भाजपाला सोडून घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!