Share

औरंगाबादेत मुख्य जलवाहिनी फुटली, अनेक दुकानांत पाणी शिरून लाखोंचे नुकसान

Published On: 

औरंगाबाद : स्मार्ट सिटीची शहरात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल विट्ससमोर रस्त्याच्या कामादरम्यान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या मेन व्हॉल्व्हचा जॉइंट निखळला. यामुळे ही तब्बल 1400 मिलिमीटरची जलवाहिनी फुटून 50 ते 100 फूट उंच पाण्याचे फवारे उडाले.

जलवाहिनी फुटण्याची घटना रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. यानंतर पाण्याच्या दाबामुळे अनेक दुकानांवरील शेड उडून गेले. रात्रीची वेळ असल्याने रस्ते निर्मनुष्य होते, म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जलवाहिनी फुटून तब्बल चार ते साडेचार तास पाणी वाहत होते. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रात्रीच्या या घटनेनंतर अनेकांनी मनपा अधिकाऱ्यांना फोन करून तत्काळ माहिती दिली. मनपा अभियंता किरण धांडे यांनी लगोलग घटनास्थळी पोहोचून कर्मचाऱ्यांना बोलावले. यानंतर पैठण रोडवरील व्हॉल्व्ह बंद करून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. तोपर्यंत चार तासांत लाखो लिटर पाणी वाया गेले. या पाण्याचा लोंढा एवढा मोठा होता की, हॉटेल विट्ससमोरून हे पाणी थेट रेल्वे स्टेशनवरील आरटीओ ऑफिसपर्यंत पोहोचले होते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!