औरंगाबाद : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता राज्यमंत्री अब्दुल सत्तार अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होते. दिल्ली निगमच्या शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता राज्यमंत्री सत्तार आग्रही होते. यासंदर्भात त्यांनी ग्रामविकास विभागाला प्रस्तावही पाठविला. त्यानंतर ग्रामविकास विभागाने यासाठी सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली असून, दिल्लीच्या शैक्षणिक कार्य पद्धतीवर ते अभ्यासक्रम विकसित करणार आहेत.
आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानासह आधुनिक पद्धतीने जगातील सर्व अत्याधुनिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काळानुरूप मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी व शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्त, शिक्षकांची शिकवण्याची कार्यपद्धती यांचा सखोल अभ्यास तज्ज्ञ करणार असून, त्याचा अहवाल राज्य सरकारला ते लवकरात लवकर सादर करणार आहेत.
दिल्ली निगमच्या शाळांच्या शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, सहशिक्षक काशिनाथ पाटील, नगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, सिल्लोड येथील सहशिक्षक जगन सुरसे आणि जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथील मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का?’, ‘त्या’ भेटीवर सेना-राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
- ‘मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी’, प्रा. हरी नरकेंचा आरोप
- ‘तुला काय फरक पडतोयं’; सामन्यापूर्वी केकेआरचा रोहितला न खेळण्याचा सल्ला
- काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन
- जॅकी उर्फ ‘जग्गुदादा’ची टपोरी भाषा ऐकायला मिळणार ; ‘बिग बी’सोबत चाहत्यांमध्ये उत्सुकता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

