Share

महत्वाची बातमी : दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर! 

Published On: 

🕒 1 min read

पुणे : २०२१ मध्ये दहावीच्या परीक्षा (SSC) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे वृत्त हाती येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षा अर्ज भारण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.

यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं, असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज भरता येणार आहे. तर, पुनर्परीक्षार्थी वा खासगी विद्यार्थ्यांना 12 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 दरम्यान प्रचलित पद्धतीनं ऑनलाइन अर्ज भरू शकतील.

सद्या परीक्षा अर्ज भरण्यासाठीचं वेळापत्रक जरी जाहीर करण्यात आलं असलं तरी २०२१ मध्ये नेमक्या परीक्षा कधी होणार यावर मात्र बोर्डाने स्पष्टता केलेली नाही. दरम्यान, २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल जुलै २०२० मध्ये लावण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च ऐवजी एप्रिल आणि दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यासंबंधी चाचपणी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!