कोल्हापूर : राज्यातील ग्रामीण भागात आरोग्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्रधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी चंदगड येथे ट्रामा केअर सेंटर उभारणीस आवश्यक असणाऱ्या जागेस निधी मिळवून देण्यास आणि या भागात अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी पाठपुरावा करु, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चंदगड येथे बोलताना केले.
चंदगड तहसील कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस खासदार संजय मंडलिक, राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरपंचायतीच्या अध्यक्षा प्राची काणेकर, पंचायत समिती सभापती आनंद कांबळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील आदी उपस्थित होते.
स्वस्तधान्य दुकानातून ऑगस्ट महिन्यात गहू तांदळासोबत मक्याचेही होणार वितरण
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, गेले चार-पाच महिने राज्य शासन कोरोनाशी लढा देत आहे. या लढ्यात राज्यातील आरोग्य, महसूल, पोलीस यासह अन्य यंत्रणा चांगले काम करत आहेत. यामुळेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण यशस्वी होऊ. चंदगड तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या ट्रामा केअर सेंटरसाठी एमआयडीसीकडील जमिनीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. चंदगड व परिसारातील ग्रामीण जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा एका छताखाली मिळाव्यात यासाठी या भागात अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठीही पाठपुरावा केला जाईल. चंदगड ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, राज्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आहे. कर्नाटकातील के.एल.ई. हॉस्पिटलचाही योजनेत समावेश केल्याने येथे उपचारसाठी येणाऱ्या राज्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रवळनाथ पतसंस्था, चंदगड अर्बन बँक आणि वेणू गोपाल पतसंस्थेमार्फत चंदगड ग्रामीण रुग्णालयास ५ व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. व्हेंटिलेटरसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ रुग्णालयास उपलब्ध करुन दिले जाईल. चंदगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य विषयक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राध्यान दिले जाईल. चंदगड तालुक्यात सुरवातीच्या काळात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब होती. मात्र प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळेच आज चंदगड तालुक्यात रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येते. प्रशासनाने केलेले काम कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. यापुढील काळात तालुक्यात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत यासाठी दक्ष रहावे, असे ही राजेंद्र पाटील- यड्रावकर म्हणाले.
आकडा टाकून वीज वापरणाऱ्यांची आता खैर नाही;चोरी करताना पकडल्यावर होणार कडक कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

