Share

‘गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने बहुजन समाजाचा अभिमान व स्वाभीमान वाढला’

Published On: 

सांगली : गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टिका ही बहुजन समाजावर आत्तापर्यंत झालेल्या आन्यायाची तिकट प्रतिक्रिया आहे. ही नक्कीच जिव्हारी लागणारी असली तरी बहुजन समाजातील अनेक नेते, कार्यकर्ते यांचा स्वाभिमान व आभिमान जागा करणारी आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात मात्र आ. पडळकर यांनी शरद पवारांच्यावर केलेल्या टिकेतील शब्दा बद्दल भाजपाच्या अनेक पदाधिकार्‍यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या सह महाराष्ट्रातील जनतेला आदर व आभिमान आहे. पडळकर यांनी वापरलेल्या शब्दा बद्दलही त्यांनी स्वतः दिलगीरी व्यक्त केली आहे तरी राष्ट्रवादी पक्षाने एका बहुजन समाजातील कार्यकर्ताच्या प्रतिमेची विटंबना करणे हा सुध्दा प्रकार म्हणजे बहुजन समाजाची विटंबना केल्यासारखी आहे. इस्लामपुर शहर व इस्लामपुर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा गोपिचंद पडळकर यांच्या बरोबर सदैव राहिल असे मत वाळवा तालुका भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील(दादा) यांनी व्यक्त केले.

पडळकरांना ‘फुल्ल सपोर्ट’ ! पवारांच्या बारामतीतच पडळकरांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा

यावेळी बोलताना प्रसाद पाटील(दादा) पुढे म्हणाले, गेली अनेक दशक कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने राज्यात व देशात सत्ता भोगली. मात्र आघाडी सरकारच्या काळात पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जनतेपेक्षा स्वतःचा विकास जास्त केला. बहुजन समाजाला ठराविक अंतरावर ठेवुन प्रत्येक निवडणुकीत पोकळ आश्वासने देवुन बहुजन समाजाचा निवडणुकीतील मता पुरता वापर करून घेतला. या लोकांनी राजकारणात स्वतःचे राजकिय वारसदार पुढे आणले, बहुजन समाजाला कधीही विचारात घेतले नाही अथवा बहुजन समाजातला कार्यकर्ता घडवला नाही याची खंत आजही बहुजन समाजाला आहे, याची अस्वस्था आ. गोपिचंद पडळकर यांनी आपल्या आक्रमकतेतुन दाखवुन दिली. आणि तिच आक्रमकता राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या जिव्हारी लागली आणि असंस्कृत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी बहुजन समाजाच्या आ. गोपिचंद पडळकर सारख्या कार्यकर्तांच्या प्रतिमेला काळे फासणे, चप्पलने झोडणे, फिरू व फिरकु देणार नाही अशी दादागिरीची भाषा वापरने, हे हि तितकेच खेद जनक आहे. हे बहुजन समाज कधीही सहन करणार नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुटुंबांतील व्यक्तीवर व्यक्तीगत टिका करून खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला तर आ. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल ही अनेक वेगवेगळे शब्द वापरले गेले. मात्र आम्ही व आमच्या पक्षातील कोणत्याही पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या अविचारी संस्कृतीकडे लक्ष दिले नाही. यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्तांनी भाजप पक्षाच्या विचाराबद्दल व संस्कृतीबद्दल बोलू नये.

महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असताना विधानपरिषदेची निवडणुक बिन विरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे विनंती केली होती व त्यांनी तात्काळ त्याला मंजुरी दिली होती मात्र भाजपच्या वतीने सांगली जिल्हयातील बहुजन समाजाचा संघर्षात घडलेला नेता म्हणजे आ. गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली यातच संपुर्ण महाराष्ट्रभर अविचाराने व संस्कृतीला न पटणारे राजकारण करणारे, फक्त पै-पाहुण्यांचे हित बघणारे ,संकुचित मनाच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने गोपिचंद पडळकर हे बहुजन समाजातील आहेत म्हणुन त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला हा सुध्दा बहुजन समाजाचा अपमान आहे. या नेत्याने कधीही कामाच्या, कर्तबगार, सुसंस्कृत व बहुजन समाजातील कार्यकर्ताला कधीही राजकारणात मदत केली नाही किंवा संधी दिली नाही. हे अनेक चांगल्या कार्यकर्ताचे दुर्देव आहे. अशा कुरघोडया बहुजन समाज कधीही विसणार नाही. आ. गोपिचंद पडळकर हा बहुजन समाजातील हाडाचा कार्यकर्ता आमदार होतोय हे सुध्दा सांगली जिल्हयातील या राष्ट्रवादीच्या नेत्याला पचणी पडले नाही हे संपर्ण सांगली जिल्हयाने ओळखले आहे. असे शेवटी वाळवा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष प्रसाद पाटील (दादा) म्हणाले.

यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर हुबाले, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई मटकरी, भाजपाचे शहराध्यक्ष अशोकराव खोत, वाळवा तालुका युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, वाळवा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष विकास पाटील, भाजपाचे संदिप सावंत, दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, गजानन पाटील, नंदकुमार कुंभार, संजय हवलदार, अजित पाटील, सतेज पाटील, धनराज पाटील, अक्षय कोळेकर, प्रविण परिट, रियाज पटेल, फिरोज पटेल आदि सह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

‘सामना’तून पडळकरांना धडे देणे म्हणजे शशी थरूर यांनी ब्रह्मचर्याचे धडे देण्यासारखे…

इस्लामपुर शहर भाजपच्या वतीने भाजपाचे गोपिचंद पडळकर यांच्या प्रतिमेची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या विटंबनेचा निषेध केला. इस्लामपुर शहरातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर शहरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येवुन आ. गोपिचंद पडळकर यांना समर्थन देत गोपिचंद पडळकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी शहरातील भाजपाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक , कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!