Share

पश्चिम बंगालमध्ये राहायचे असेल तर बांग्ला आलीच पाहिजे – ममता बॅनर्जी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : जर बंगालमध्ये राहायचे असेल तर बांग्ला बोलता आलीच पाहिजे असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ममता बॅनर्जी या डॉक्टरांच्या संपामुळे घेरल्या गेल्या आहेत, त्यावेळी बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांवर हल्ला चढविताना बांग्ला कार्ड वापरत भाजपवर निशाणा साधला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर परगना जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करत होत्या, त्यावेळी आपल्याला बांग्ला भाषेला पुढे आणले पाहिजे. जेव्हा मी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पंजाबमध्ये जाते तेव्हा तेथील भाषा बोलते. जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये राहत असाल तर तुम्हाला बांग्ला भाषा आलीच पाहिजे, असे त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर इकडे तिकडे फिरतात असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, त्यांनी डॉक्टरांच्या सुरु असलेल्या संपावरही त्यांनी भाष्य केले. भाजपा आणि सीपीएम डॉक्टरांना भडकवत असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचे काम करत आहे, असा आरोपही ममता बनर्जी यांनी केला.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!