टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. यात सरकारवर वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी गमतीशीर वक्तव्य केले. यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला.
भास्कर जाधव यांना कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यविकास या खात्याशी संबंधित चर्चा करायची होती. त्यांनी संबंधित खात्याच्या चर्चेला प्रारंभ करून सत्ताधारी बाकाकडे पाहिले असता, तिथे मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर जागेवर नसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी चार ते पाच मिनिटे आपले भाषण थांबविले. तेव्हा अध्यक्षांनी हातातील चिठ्ठी उंचावरून त्यांना निरोप पाठविला आहे, तुम्ही भाषण सुरू ठेवावे असे आ. जाधव यांना संबोधून सांगितले.
यादरम्यान त्यांनी ‘विधानसभा अध्यक्षांनी बोलावलं, तर मंत्र्यांनी पँट सावरत सभागृहात पळत आलं पाहिजे, आम्ही मंत्री असताना अध्यक्षांनी बोलावल्यास पळत यायचो…’ अशी टिप्पणी केली त्यानंतर सभागृहात एकाच हशा पिकला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

