टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहत असलेल्या ‘वर्षा’ या सरकारी बंगल्याचा ५ वर्षांचा मालमत्ता कर देखील थकला असल्याचे समोर आले आहे. यावरून कॉंग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना ट्विटर वरून लक्ष केले आहे. जिथे मुख्यमंत्रीच थकबाकीदार असेल तिथे इतरांनी कर भरावे ही अपेक्षाच करणे फोल ठरते, असे टि्वट काँग्रेसने त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलरवरुन केले आहे.
या ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, पाणी बिल थकवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकत वर्षा निवासस्थानाचा मालमत्ता करही थकवलाय. यावरूनच राज्यात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची प्रचिती येते. जिथे मुख्यमंत्रीच थकबाकीदार असेल तिथे इतरांनी कर भरावे ही अपेक्षाच करणे फोल ठरते.
पाणी बिल थकवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकत वर्षा निवासस्थानाचा मालमत्ता करही थकवलाय. यावरूनच राज्यात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची प्रचिती येते. जिथे मुख्यमंत्रीच थकबाकीदार असेल तिथे इतरांनी कर भरावे ही अपेक्षाच करणे फोल ठरते. pic.twitter.com/vE5AJ2fizG
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 26, 2019
दरम्यान राज्यात भाजप युतीचे सरकार आल्यापासून ‘वर्षा’ निवासस्थानाचा सुमारे सात लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकलेला आहे. दोनच दिवसांपूर्वी ‘वर्षा’ निवासस्थानाची पाणीपट्टी थकल्याचे प्रकरण बाहेर आले होते. हा मुद्दा विरोधकांनी अधिवेशनातही उपस्थितीत केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर आपला खुलासाही केला होता. त्यानंतर लगेचच मालमत्ता कराच्या थकबाकीचेही प्रकरण समोर आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

